नांदपूरवासींचा ११ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा

  • Post category:News

दूषित पाणीपुरवठा, नळयोजनेच्या जलवाहिनीमुळे रस्त्यांची दैनावस्था, खड्डे व ग्रामपंचायतच्या निष्काळजी कारभाराला त्रस्त होऊन नांदपूर येथील युवकांनी सरपंच, सचिव यांना निवेदन देत समस्या १५ दिवसांच्या आत निकाली न काढल्यास ११ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा दिला.

 
नांदपूर गावामध्ये कित्येक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. नळाला पाणी हे चार दिवसांनी। येते, वारंवार निर्माण होणारी पाणीटंचाई महिन्यातून एकवेळा ठरलेलीच असते आणि पिण्याचे पाणी हे अतिशय गढूळ प्रमाणात आढळून आले. यावर तात्काळ उपायोजना करा असे या निवेदनात. म्हटले आहे.
नवीन नळ योजनेसाठी केलेले खोदकाम यामुळे रस्त्यावर पाणी साचून खुप चिखल राहतो. यामुळे नागरिकांना होतो त्रास. १५ ऑगस्टला गावांमधून प्रभातफेरी निघत असते. याकरिता खड्डे बुजवण्यात यावे, गावात कचरा कुंडी गावातील काही लोकांना अजूनही मिळालेल्या नाही, त्या लवकर देण्यात याव्या, अशा विविध मागण्यांसाठी निवेदन दिले. गावात व्यायामशाळा नाही, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यावर तात्काळ उपाय योजना करा अन्यथा ११ ऑगस्ट
 
पासून ग्रामपंचायत कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसू, असा इशारा देण्यात आला. निवेदन देतेवेळी रॉयल क्लब नांदपूर तसेच मित्र परिवारातील सदस्य हजर होते यामध्ये भाग्येश प्रशांतराव जगताप, आशिष डोंगरे, अजय दमाहे निखिल सावरकर, गौरव वानखडे, रेहान पखाले, अजय मुर्खे, तेजस गराडे, पराग मुन्द्रे, आदित्य जगताप, शंतनू जगताप, संकेत धूल, विजूभाऊ वानखडे यांनी निवेदन दिले. तालुका प्रतिनिधी.

Leave a Reply